Maharashtra: रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट ! बोनस मंजूर

1
19
railway workers, bonus,
रेल्वे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट! बोनस मंजूर

नवी दिल्ली

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. मोदी मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या विशेष बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनस योजनेला केंद्राने मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस मंजूर करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra१००-रुपयांच्या-स्टॅम्प/

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेच्या चांगल्या कामगिरीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यां ना २,०२९ कोटी रुपयांच्या उत्पादकतेशी संबंधित बोनसला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा ११ लाख ७२ हजार २४० कर्मचाऱ्यांना होणार आहे. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन, टेक्निशियन असिस्टंट, पॉइंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ आणि ग्रुप एक्ससीचे इतर कर्मचारी अशा विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे.

1 COMMENT

  1. […] बदलापूर मध्ये आदर्श विद्या मंदिर शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचार्‍याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर आता तसाच प्रकार पुण्यातील वानवडी भागात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका शाळेतील मुलींना चालत्या स्कूल व्हॅनमध्ये त्रास दिल्याचं समोर आलं आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रेल्वे-कर्मचाऱ्यांना… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here