Maharashtra: रेल्वे विभाग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नोकरीत घेणार !

0
90
रेल्वे भरती;
रेल्वे विभाग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा नोकरीत घेणार

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार मुंबई /21 ऑक्टोबर

रेल्वे विभाग जवळपास २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत घेणार आहे. यासाठी काही अटी शर्तीदेखील लागू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांची कमी जाणवू लागली आहे. विद्यमान कर्माचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharshtraआचारसंहिता-लागू-झाल्या/

या भरतीप्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी झोन प्रमुखांकडे देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत ट्रकमॅनपासून ते सुपवाझर पदांपर्यंत अशी सर्वच पदं भरली जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांविरोधात निवृत्त होण्याच्या आधीच्या पाच वर्षांत अनुशासनात्मक कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांना २ ते ५ वर्षांपर्यंत नोकरीत घेतलं जाणार असल्याचे समजते. या कर्चमाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी असलेला शेवटचा पगार वेतन म्हणून दिला जाणार आहे. तसेच प्रवास खर्च आणि इतर भत्तेही दिले जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन दिले जाते, अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून निवृत्त वेतनाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम वेतन म्हणून दिली जाणार आहे. तसेच म्हणजे या कर्मचाऱ्यांना कोणतीही पगारवाढ दिली जाणार नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here