Maharashtra: वृद्ध कलावंत व साहित्यिकांनी मानधन योजनेसाठी आधार पडताळणी करावी

1
14
वृद्ध कलावंत व साहित्यिकांनी मानधन योजना
वृद्ध कलावंत व साहित्यिकांनी मानधन योजनेसाठी आधार पडताळणी करावी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l रत्नागिरी l 04 डिसेंबर

राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजनेतील यापूर्वी मंजूर कलावंत/साहित्यिकांनी mahakalasanman.org/AadharVerification.aspx या लिंकवर जाऊन आपला आधार क्रमांक व त्याच्याशी संलंग्न मोबाईल क्रमांकाबाबतची माहिती अद्ययावत करावी.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-puma-कंपनीचा-लोगो-वापरुन-बन/

जिल्ह्यातील 852 मंजुर कलावंतांपैकी 648 कलाकारांचे आधार पडताळणी झाली असून अद्याप 204 कलावंतांनी आधार पडताळणी केली नाही. ज्या कलावंतांनी आधार व मोबाईल क्रमांक पोर्टलवर अद्ययावत केलेले नाहीत त्यांचे मानधन 10 डिसेंबर 2024 पासून शासन स्तरावरून थांबविण्यात येणार आहे. ज्या कलावंतांची पोर्टलवरील आधार पडताळणी प्रलंबित आहे त्यांनी स्वतःचे आधार कार्ड, वारस पति/पत्नीचे आधार कार्ड व बँक पासबुक यासह संबंधित पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय तसेच महा-ई सेवा केंद्रावर जाऊन वरील लिंक वापरून आधार पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here