मुंबई– शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता चाचणी (टेट) परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना एडीटचा ऑप्शन नसल्याने परीक्षा अर्जात काही चूक झाल्यास दुरुस्तीची संधी उमेदवारांना मिळत नसून पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागत आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-क्रिकेट-स्पर्धा-म्हणजे/
तसेच अर्जावर निळ्या शाईने स्वाक्षरी केल्यास संपूर्ण अर्जच बाद होत आहे. अर्ज भरताना काही चूक झाल्यास नव्याने नोंदणी करताना विद्यार्थ्यांना पुन्हा ९५० रूपये शुल्क भरावे लागत आहेत. टेट परीक्षेसाठी एकदा भरलेला अर्ज दुसऱ्यांदा दुरुस्त करण्याची कोणतीही मुभा नसल्याने उमेदवारांची अडचण झाली आहे.

