Maharashtra: शिवजयंती प्रमाणे आता पंढरपूरची वारी टार्गेट करण्याचा प्रयत्न ?     

0
126
शिवजयंती ,पंढरपूर,
शिवजयंती प्रमाणे आता पंढरपूरची वारी टार्गेट करण्याचा प्रयत्न ?

अशोक राणे

महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव व पंढरपूरची आषाढी एकादशी लोकउत्सव आहेत शिवजयंती उत्सवात सर्व समाज सहभागी होत असते तर पंढरपूरच्या वारी मध्ये”ज्ञानबा- तुकाराम” गजर करीत शहरी ते ग्रामीण भागातील हजारो दिंडया व लाखो वारकरी “ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ,वैकुंठीचा राणा डोळ्याने पाहू ” म्हणत पंढरपूरच्या दिशेने पायी,अनवाणी चालत भक्तिमय होतो शिवजयंती लोकशक्तीचा तर पंढरपूरची वारी लोकभक्तीचा उत्सव आहे परंतू गेल्या दशका पासून शिवजयंती उत्सवात खोटा इतिहास सांगून वाद निर्माण करण्यात येत आहेत त्याच प्रमाणे पंढरपूरच्या वारी मध्ये काही विघातक मंडळी संभ्रम व अफवा अशा वेगवेगळ्या षडयंत्राचे प्रयोग करून वारीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत शिवजयंती उत्सवमध्ये  खोटे तथा अर्धवट संदर्भ देऊन शिवभक्ता मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच प्रमाणे आता पंढरपूरच्या वारीमध्ये जातीपातीचे व ईतर षडयंत्राचे प्रयोग करून पंढरपूर वारीला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे.महाराष्ट्रातील काही समाज विघातक संघटना संस्थांच्या कार्याचा मागोवा घेतल्यास अनेक वर्षा पासून हिंदू समाजाचे सणउत्सव, हिंदूसमाजाचे प्रेरणास्थान व दैवत,महापुरुषांच्या जयंती, पुण्यस्मरणच्या निमित्ताने हिंदू समाजाचां बुद्धिभेद व दिशाभूल करून जातीपाती मध्ये विभागण्याचे षडयंत्र करीत आहेत व काही अंशी त्यांच्या षडयंत्राच्या प्रयोगमध्ये यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास ज्या संत,महात्मे,महापुरुषांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले,समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवले त्यांच्या जयंती,पुण्यतिथी उत्सवमध्ये दुर्दैवाने केवळ त्याच समाजाची, जातीची माणसं दिसतात सर्व समाज त्यामध्ये सहभागी होत नाही महापुरुष संतांच्या जयंती, पुण्यतिथीचे उत्सव समाजाचे नव्हे तर एका ठराविक जातीचे उत्सव ठरत असल्याचे विदारक सत्य समाजात स्पष्ट दिसत आहे   https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सामान्य-ग्राहकांना-प्र/                                                                                                                              

महाराष्ट्रात काही समाज विघातक मंडळीनी शिवजयंती उत्सवात समाज प्रबोधनाच्या गोंडस नावाखाली वादविवाद निर्माण करण्यासाठी अनेक खोट्या इतिहासाचे,अर्धवट संदर्भ देऊन भांडवल केलेल आहे समाजाला संभ्रमित करण्यासाठी प्रचंड प्रमाणात साहित्य सुध्दा निर्माण केलल आहे उदाहरण दाखल श्रीमंत कोकाटे यांच्या विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज पुस्तकात किती मोठा खोटा इतिहास सादर केला जात आहे लक्षात येते सदर श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाच्या उताऱ्यात शिवरायांच्या सैन्यात ५७ तक्के मुस्लिम सैन्य होते, जैन व बौद्ध सुद्धा होते सेनापती,सरदार वकील मुस्लिम होतें असा कांगावा करून मुळातच सहिष्णू असलेल्या शिवरायांना धर्मनिरेक्ष ठरविण्याचा खोटा इतिहास प्रस्तुत करून वैचारिक गोंधळ निर्माण केला आहे वास्तविक पाहता शिवकालीन इतिहासाच्या कोणत्याही बखरी तपासल्या तरी शिवरायांच्या सैन्यात बोटावर मोजण्या इतकेच मुस्लिम होते हा सत्य इतिहास आहे परंतू सभ्रम निर्माण करण्यासाठी उपरोक्त प्रमाणे कांगावा केला जातो तसेच शिवजयंती इंग्रजी तारखे प्रमाणे की तिथी नुसार असा वाद निर्माण करून शिवभक्ता मध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न सुद्धा सतत केला जातो आपल्या देशात सर्व पंथातील महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी तिथी नुसार करण्याची परंपरा आहे भगवान गौतम बुद्ध ,भगवान महावीर महात्मा बसवेश्वर, विश्वकर्मा अग्रसेन, गुरू नानक पासून गुरू गोविंदसिंग तसेच ज्ञानेश्वर माऊली पासून संत तुकाराम महाराज यांच्या स्मरणाचे उत्सव तिथी प्रमाणे साजरे केले जातात पण शिवजयंती इंग्रजी तारखे प्रमाणे साजरी करून  शिवभक्तां मध्ये उभी फूट पाडण्याचे षडयंत्र केले जाते                                                                                                                         

शिवजयंती प्रमाणे आता विघातक शक्ती पंढरपूर वारीला टार्गेट करीत असल्याचे लक्षात येत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो दिंड्या व लाखो वारकरी पंढरपूरला येत असतात त्यामुळे वारीमध्ये वारकरी बंधूत भेद जातीपातीचे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो वारकरी संप्रदाय मध्ये टाळकरी- माळकरी, तुकोबांना मानणारे, ज्ञानोबा माऊलीना मानणारे असे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू झालेला आहे सोबतच पंढरपुरात येणाऱ्या संत एकनाथ ते नामदेव महाराज व ज्ञानेश्वर माऊली ते तुकोबांच्या पालख्यां मध्ये”ज्ञानबा तुकाराम”नव्हे तर”नामदेव तुकाराम” गजर करण्याचा प्रयत्न करून वारकऱ्यामध्ये गोंधळ निर्माण केला गेला आहे तुकोबांच्या अर्धवट अभांगाचा सोईस्कर प्रयोग करुन तुकोबा”वैदिक की विद्रोही-तुकारामाचे वैकुंठ गमन की हत्या” असा वैचारिक गोंधळ निर्माण केलेला आहे मागील वर्षीच्या वारी मध्ये तुकोबांचा अभंग मोठ्या प्रमाणात मीडिया,सोशल मीडियात जाणीवपूर्वक फिरवून वारकरी बंधुत संभ्रम निर्माण करण्यात आला आहे                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             आपल्या देशाचा पाया अध्यात्म असून सर्व संतांनी समाजात सतत “भेदा भेद भ्रम अमंगळ – विश्व ची माझे घर” असे उदात्त व सर्वसमावेशक सहिष्णू विचार दर्शन मांडले आहे सर्व संताच्या प्रार्थना मानव उत्थानाच्या व लोकमंगल कामनेच्या राहिलेल्या आहेत तुकोबांच्या गाथे मध्ये जवळपास ४००० अभंग असून समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर भाष्य केलेल आहे वेद शास्त्र पासून ज्ञान अध्यात्म व ज्ञान विज्ञान ते पर्यावरण अशा विविध पैलूचे महत्व सुध्दा विशद केले आहे. परंतू ज्या प्रमाणे गेल्या दोन शतका पासून महाराष्ट्रात चुकीचा खोटा इतिहास मांडून शिवरायांची धर्मनिरपेक्ष व मुस्लिम धार्जिणे अशी प्रतिमा उभी करण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्याच प्रमाणे तुकोबा यांचा उपरोक्त अभंग खोडसाळ बुद्धीने प्रस्तुत करून तुकोबा मुस्लिम धार्जिणे, मुस्लिम सुफी संत परंपरा मानणारे किंवा अल्लाची भक्ती करणारे होते असा चेष्टा करणारा गैरसमज निर्माण करणारा प्रयोग झालेला आहे वारकरी संप्रदाय मध्ये असे संभ्रम निर्माण करणारे प्रयोग करून वारकरी जातीपंथात कसा विभागला जाईल, दुफळी कशी निर्माण केली जाईल यासाठी आता कसोशीने प्रयत्न केले जात आहेत एकूणच काही समाज विघातक मंडळी पंढरपूर वारी मध्ये घुसल्या असून त्यांनी षडयंत्रांचे सर्व प्रयोग ठरवून व सुनियोजितरीत्या करण्यास सुरुवात केली आहे तसेच वारी मधिल सामाजिक समरसता व सामाजिक एकतेचे विशाल दर्शन विघातक मंडळीच्या डोळ्यात सतत खुपत असल्याने त्यांना सामाजिक एकतेचा कणा मोडायचा आहे म्हणूनच त्यांनी पंढरपूर वारीला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला आहे                                                                                                                                           

महाराष्ट्रात होत असलेल्या शिवजयंती उत्सवा मध्ये किंवा पंढरपूरच्या वारी मध्ये कोणीही व कधीच जातीपातीचा विचार करीत नाही शिवजयंती मध्ये सामील झालेला प्रत्येक माणूस स्वतःला शिवरायांचा मावळा व पंढरपूरच्या वारी मध्ये सामील झालेला प्रत्येक माणूस स्वतःला केवळ विठोबाचा वारकरी समजतो हे पक्क समीकरण आहे त्यामुळे विघातक शक्ती हिंदू समाजातील सामाजिक एकतेच समीकरण बिघडविण्या साठी तसेच वारकरी संप्रदाय मध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत भविष्यात त्यांचे प्रयत्न तीव्र केले जातील याची जाणीव ठेऊन समाज विघातक मंडळी यशस्वी होणार नाहीत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे                                                                                                                                                                                                                    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here