मुबंई- सोन्याची मागणी वाढल्याने दराने उच्चांक गाठला. शुद्ध सोन्याचा प्रतिदहा ग्रॅम दर ७८,७०० रुपयांवर गेला. येत्या दिवाळीपर्यंत हा दर ८० हजार पार जाण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर गेल्या चार दिवसांत तोळ्यामागे एक हजार रुपयांनी वाढले. तीन दिवसांपूर्वी ७७ हजार ५०० रुपये तोळे सोन्याचा दर होता. सोमवारी तो ७८,५०० रुपये झाला. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊन सोने प्रतितोळा ८० हजार रुपये पार जाईल. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-भगवान-गौतम-बुद्धांच्या/
मुबई यंदा २० लाख विवाह अपेक्षित असून तब्बल ६०० कोटींची उलाढाल होईल, अशी माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली. सोन्याची चढ-उतार गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. गेल्या तीन दिवसात सराफ बाजारात सोन्याची चढ-उतार झाली असून सोने प्रतितोळे १ हजार रुपयांनी महाग झाले. मात्र सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या आजही तेवढीच असल्याचे कुमार जैन यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी सोन्याचा दर प्रतितोळे ७७,५०० रुपये होता. सोमवारी हाच दर ७८,५०० रुपये तोळे झाला. म्हणजेच १ हजार रुपये प्रतितोळे सोने महाग झाले. शिवाय तीन टक्के जीएसटी आणि ६०० रुपये घडणावळ असे मिळून एक तोळे सोने ८१,४५५ रुपये प्रतितोळे होते. दिवाळीत सोन्याच्या दरात आणखी वाढ होणार असून तोळ्याचा भाव ८० हजार रुपये पार जाईल. म्हणजे जीएसटी आणि घडणावळ धरून एक तोळे सोने ८३,००० रुपये होण्याची शक्यता कुमार जैन यांनी वर्तवली आहे.
मुंबईत यंदा २० लाख लग्नसोहळे होणार असल्याने सराफ बाजारात ६०० कोटींची मोठी उलाढाल होईल, असे जैन म्हणाले, तर चांदीचे दर किलोला आज सोमवारी ९५,००० रुपये होते. चांदी ही किलोमागे ३ हजार रुपयांनी महागली. दरम्यान, आशियाई बाजारात सोन्याचा प्रतिऔंस (२८.३४ ग्रॅम) दर २,६७१.५० डॉलरवर गेला आहे. भारतीय चलनात ही रक्कम २ लाख २४ हजार रुपये होते. भारतात सणांमुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
[…] […]