वडजी – बिकट परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश मिळवणारे वडजी गावचे सुपुत्र श्री. अतुलजी गुरुदेव डांगे यांची महाराष्ट्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयात ‘सहायक संचालक‘ म्हणून नांदेड येथे नियुक्ती. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शासनाच्या-मुख्यमंत्री/
सामान्य घरातून जन्माला आलेला माणूस, पण काम मात्र असामान्य… वडजी गावातील साऱ्या तरुण मुलांना प्रेरणा देणारं ठरतं आहेत. अतुल डांगे हे धाराशिव जिल्ह्यातील वडजी या गावी राहत आहेत. वडजी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी सातवी पर्यंत शिक्षण घेतलं. पुढील शिक्षण त्यांनी बार्शी येथे घेतले.
अतुल डांगे यांचे वडील शेती करतात. घरची परिस्थिती हलाकीची होती. शेतात वेळेवर उत्पन्न मिळत नव्हतं. म्हणून त्यांनी गँरेज मधुन पाट्याचे काम शिकून घेतले व येरमाळा येथे टपरी वजा पाटा दुरुस्तीचे काम सुरु केले. जेणेकरून घराला आर्थिक मदत होईल.
आई वडिलांचे कष्ट मुले जवळून पाहत होते. आयुष्यात काहीतरी करण्यासाठी आपण पावलं उचलली पाहिजेत अस त्यांना वाटू लागलं आणि याच सवयी मुळे त्यांना पुढे फायदा झाला.