Maharashtra: सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

0
67
सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक

⭐बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार ⭐मंत्रिमंडळ बैठकीत आज 18 मोठे निर्णय

मुंबई –: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज 18 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील थीम पार्कसह सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक अशा निर्णयांचा समावेश आहे.

राज्य मंत्रिमंडळात या व्यतिरिक्त आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणे, बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार, एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी 24 हजार कोटीची शासन हमी. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून 850 कोटी अर्थ सहाय्य घेणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र, जीएसटीमध्ये नवीन 522 पदांना मान्यता , राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद भरणार, एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकार्‍यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने, विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना राबवणार राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प, अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड , डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश. मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार, शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक, उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ, राज्यातील 61 अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता देणार हे निर्णय घेण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-शांताराम-उर्फ-बाळा-गोसाव/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here