
मुंबई:एक आघाडीचे टायर उत्पादक सीईएटीने ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलतर्फे आयोजित आरोग्य आणि सुरक्षाविषयक सर्वोत्तम व्यावसायिक पद्धतींच्या मूल्यमापनामध्ये (ऑक्युपेशनल बेस्ट प्रॅक्टिस हेल्थ अँड सेफ्टी ऑडिट) पंचतारांकित दर्जा मिळवून ते ऑडिट यशस्वीरीतीने पूर्ण केले आणि आपली आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली व संबंधित व्यवस्थांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची वचनबद्धता दर्शविली. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल्यात-रंगणार-13-रो/
ऑफ हायवे टायर बनविणाऱ्या सीईएटी स्पेशॅलिटीच्या अंबरनाथ प्लांटच्या व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षाविषयक धोरण, प्रक्रिया आणि पद्धतींचे सर्वसमावेशक, प्रमाणबद्ध आणि कठोरपणे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये दस्तावैजिकरणाचे पुनरावलोकन, वरिष्ठ व्यवस्थापक, कर्मचारी आणि महत्त्वाच्या भागधारकांसह मुलाखती आणि कामकाजाच्या पद्धतींचे सॅम्पलिंग (मूल्यमापनाची एक पद्धती) हे समाविष्ट होते.
या मूल्यमापनामध्ये व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या सर्वोत्तम पद्धती निर्देशांकांच्या आधारावर अंबरनाथ प्लान्टचे कामकाज तपासले गेले आणि जवळपास साठ घटकांचा तपशीलवार आढावा घेतला गेला. या ऑडिटनंतर सीईएटी स्पेशॅलिटीच्या अंबरनाथ प्लांटला पंचतारांकित दर्जा देण्यात आला, जो सर्वोत्तम पद्धती असलेल्या संस्थेचे प्रतीक आहे.
ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माइक रॉबिन्सन म्हणाले, “आमच्या आरोग्य आणि सुरक्षाविषयक सर्वोत्तम व्यावसायिक पद्धतींच्या मूल्यमापनामध्ये (ऑक्युपेशनल बेस्ट प्रॅक्टिस हेल्थ अँड सेफ्टी ऑडिट) पंचतारांकित दर्जा मिळवणे ही एक अत्यंत उत्कृष्ट कामगिरी असून ते एका अशा सक्रिय संस्थेचे प्रतिबिंब आहे जी तिच्या आरोग्य आणि सुरक्षाविषयक व्यवस्थांमध्ये निरंतर सुधारणा करण्यासाठी आणि कामगारांच्या आरोग्यासाठी व सुरक्षिततेसाठी व त्यांच्या कल्याणासाठी उत्तम जोखीम व्यवस्थापनाचा अवलंब करण्यास वचनबद्ध आहे. सीईएटीला या कामगिरीचा अत्यंत अभिमान असला पाहिजे.”
सीईएटी स्पेशॅलिटीचे चीफ एक्सिकेटिव्ह श्री. अमित तोलानी म्हणाले, “आम्हाला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे की, आमच्या सीईएटी स्पेशॅलिटीच्या अंबरनाथ प्लांटला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलतर्फे घेण्यात येणाऱ्या आरोग्य आणि सुरक्षाविषयक सर्वोत्तम व्यावसायिक पद्धतींच्या मूल्यमापनामध्ये (ऑक्युपेशनल बेस्ट प्रॅक्टिस हेल्थ अँड सेफ्टी ऑडिट) प्रतिष्ठित अशा पंचतारांकित दर्जाने सन्मानित केले गेले आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आमच्या क्रॉस फंक्श्नल टीमच्या कार्यात्मक प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या, एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. टीममधील प्रत्येक सदस्याच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे व नीट परिभाषित करून ठरवून दिल्या होत्या आणि आमचे कामगार व सहयोगगींमध्ये या मानकांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आमच्या टीमने एकत्रितपणे अथक काम केले आहे. सीईएटीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांचे आणि भागधारकांचे आरोग्य आणि सुरक्षितता हे आमचे सर्वोत महत्वाचे प्राधान्य आहे आणि आम्ही सर्वोच्च सुरक्षा मानदंड स्थापित करून ते नेहमी चालू ठेवू.”
गेल्या महिन्यात सीईएटीच्या चेन्नई प्लांटला पंचतारांकित दर्जा मिळाल्यानंतर आता अंबरनाथ प्लांटलासुद्धा हा सन्मान मिळाला आहे. सीईएटीच्या एकूण चार प्लांट्सना हा दर्जा मिळालेला असून २०१६ हलोल आणि २०१८ मध्ये नागपूर प्लांट ला हा सन्मान मिळाला होता.

