Maharashtra: सुदानमध्ये अडकलेल्या शंभर सांगलीकरांसाठी जयंत पाटील सरसावले

1
184
जयंत पाटील,निळवंडे धरण,
कोविडच्या भयंकर परिस्थितीत निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे समाधान - जयंत पाटील

परराष्ट्र मंत्र्यांकडे त्यांना सुखरूप परत आणण्याची ट्वीटद्वारे केली मागणी

मुंबई दि. २७ एप्रिल – सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले असून या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-महिंद्रा-लास्ट/

सुदानमध्ये सुरु असलेल्या देशातंर्गत यादवी युध्दामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून सुमारे १२०० किलोमीटरवर हे नागरीक आहेत. परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

1 COMMENT

  1. […] मुंबई, दि. २७ एप्रिल  – महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी  त्यासाठी केंद्रसरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यसरकारला पत्र लिहून केले आहे.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-सुदानमध्ये-अडकलेल्या… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here