Maharashtra: सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचे ज्ञान भागीदार म्हणून पीरामल फाउंडेशनसोबत भागीदारी 

0
59
सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचे ज्ञान भागीदार म्हणून पीरामल फाउंडेशनसोबत भागीदारी महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य देखभालीत प्रगती घडवून आणणार
सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचे ज्ञान भागीदार म्हणून पीरामल फाउंडेशनसोबत भागीदारी महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य देखभालीत प्रगती घडवून आणणार

महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये आरोग्य देखभालीत प्रगती घडवून आणणार

मुंबई : पीरामल ग्रुपचे लोकोपकारी कार्य चालवणारे पीरामल फाउंडेशन, सेठ जी एस मेडिकल कॉलेज आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलने (केईएम) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने हातमिळवणी करून महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या आरोग्य देखभालविषयक गरजा पूर्ण करण्याचे ठरवले आहे. यासाठी करण्यात आलेल्या एका तीन वर्षीय समझोता करारात नमूद केल्याप्रमाणे  या जिल्ह्यांमधील २८ लाख आदिवासींच्या कल्याणामध्ये सुधारणा घडवून आणणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-गायन-स्पर्धेत-मंदार-नाईक/

हा उपक्रम पालघर जिल्ह्यात सुरु होईल आणि त्याठिकाणी राहणाऱ्या ६८% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येवर प्रभाव घडवून आणेल. याठिकाणी मिळालेले प्रतिसाद आणि निष्कर्षांच्या आधारे इतर जिल्ह्यांमध्ये देखील त्याचा विस्तार करण्यात येईल. आरोग्य सूचकांकामध्ये दरवर्षी ६ ते ८ टक्क्यांची वाढ करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आदिवासी समुदायामधील कुपोषण, माता व बालक आरोग्य, ऍनिमिया आणि टीबी यासारख्या समस्यांचे निवारण करण्यात येईल.

ही भागीदारी आजार व्यवस्थापनाच्या उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक पैलूंमध्ये सुधारणा घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करेल. केईएम हॉस्पिटल पीरामल फाऊंडेशनला त्यांच्या महत्त्वाकांक्षी भारत सहयोग कार्यक्रमांतर्गत तांत्रिक सहाय्य प्रदान करेल, ज्यामध्ये लक्ष्यित जिल्ह्यांतील आघाडीच्या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी टेलिकन्सल्टेशन डायग्नोस्टिक सपोर्ट आणि क्षमता निर्माण प्रशिक्षण यांचा समावेश आहे. शिवाय, जिल्हास्तरीय आरोग्य कर्मचारी, आदिवासी उपचार करणारे आणि वैद्यकीय विद्यार्थी स्वयंसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेऊन आरोग्य सेवा क्षमतांना चालना देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या विविध समस्या सोडविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. आदिवासी उपचार करणाऱ्यांचे आदिवासी समाजातील महत्त्व ओळखून त्यांना प्राथमिक आरोग्य सेवेचे प्रशिक्षण दिले जाईल. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जिल्ह्य़ांमध्ये फेलोशिप प्रोग्रामद्वारे, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सामुदायिक सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवक बना, शिका आणि शिकवा यासाठी एक संयुक्त अभ्यासक्रम तयार करण्याची योजनाही या कार्यक्रमामध्ये समाविष्ट आहे.

पीरामलग्रुपच्याउपाध्यक्षडॉस्वातीपीरामल म्हणाल्या, “पीरामलफाऊंडेशनमध्येआम्हीवंचितसमुदायांचेकल्याणकरण्यावरलक्षकेंद्रितकरतोआम्हीसरकारीयंत्रणामजबूतकरूनआणितरुणव्यक्तींच्याऊर्जाआणिसमर्पितवृत्तीचासुयोग्यउपयोगकरूनघेऊनहेसाध्यकरतोनिःस्वार्थसेवाभावहीआमचीप्रेरणाआहेबृहन्मुंबईमहानगरपालिकेच्यासहयोगानेसेठजी.एसमेडिकलकॉलेजआणिकिंगएडवर्डमेमोरियलहॉस्पिटल (केईएमसोबतहीभागीदारीराज्यभरातीलआदिवासीसमुदायांनासशक्तकरण्यासाठीआमचीसर्वांचीवचनबद्धतादर्शवतेआरोग्यसेवांमध्येप्रगतीघडवूनआणूनसकारात्मकप्रभावनिर्माणकरण्याप्रतीआमचीसमर्पितवृत्तीदर्शवणे, “चांगलेकरावे” याआमच्यामूळतत्त्वज्ञानाचेपालनकरावेहायाभागीदारीचाउद्देशआहे.”

केईएमहॉस्पिटलआणिसेठजीएसमेडिकलकॉलेजच्याडीनडॉसंगीतारावतयांनी सांगितले,बृहन्मुंबईमहानगरपालिकेच्यासहयोगानेपीरामलफाउंडेशनआणिकेईएमहॉस्पिटलचीहीभागीदारीआरोग्यसेवेमध्येपरिवर्तनाचामार्गप्रस्तुतकरेलसेवांपासूनवंचितअसलेल्याजिल्ह्यांमध्येआरोग्यसेवांचेअधिकसुधारितपरिणामघडवूनआणण्याच्यासमानउद्दिष्टासहतज्ञआणिसंसाधनेयांचेएकत्रीकरणयामध्येघडवूनआणलेजातआहे.    हीभागीदारीप्रगतीचाप्रकाशस्तंभठरेललक्ष्यितसमुदायांनालाभप्रदानकरेलआणिव्यापकआरोग्यसेवालँडस्केपसाठीएकप्रशंसनीयउदाहरणप्रस्थापितकरेल.”

आपल्या टेलिमेडिसिन विंगमार्फत केईएम हॉस्पिटल क्लिनिकल सहाय्य देखील प्रदान करेल, उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वे पुरवेल आणि आरोग्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे संशोधन आणि दस्तऐवजीकरण करेल. इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (ईएचआर), कमांड अँड कंट्रोल सेंटर (सीसीसी) आणि प्रत्यक्ष भागांमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची डिजिटल क्षमता वाढवणे यासारख्या डिजिटलायझेशन उपक्रमांवरही ही भागीदारी लक्ष केंद्रित करेल.

कार्यक्रमाच्या सर्वसमावेशक अजेंड्यात व्हीएचएसएनडी साइट्सची स्थापना, अॅनिमिया मुक्त अभियान, क्षयरोगमुक्त उपक्रम, बालक आणि माता यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे, कुपोषण आणि असंसर्गजन्य रोगांवर उपाय करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि शालेय आरोग्य कार्यक्रम राबवणे यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here