Maharashtra: हृदयात ब्लॉकेजेस आढळल्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

0
17
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया -

मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक तपासणीत त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळल्यामुळं त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये काल सकाळी आठ वाजता दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची रुटीन चेकअप केली त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-महामार्गावर-प्राण्यांच/

उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये सुद्धा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. आज त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आल्याने त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजताच्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना मागील दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने काल सकाळी मुंबइतील रिलायन्स हरिकिसन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस आढळून आहे. त्यानंतर ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे विधानसभेच्या तयारीला लागले होते. दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शिवतीर्थावर त्यांनी पक्षाच्या परंपरागत दसरा मेळाव्याला संबोधित केलं. या मेळाव्यात त्यांनी खणखणीत भाषण करत सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. त्यावेळी ते एकदम फिट दिसत होते. मात्र त्यानंतर अचानक त्रास सुरू झाल्यानं ते चेक अपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते.

उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात दाखल असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर आता 12 वर्षांनंतर त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सोशल पोस्ट करत म्हटले की, आज सकाळी, उद्धव ठाकरेजी यांनी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी केली. तुमच्या शुभेच्छांसह, सर्व काही ठीक आहे, आणि ते कामावर येण्यासाठी तसेच लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here