मुबंई– पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी सहा हजार रुपये जमा होतात. मात्र एप्रिल २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत सुमारे ११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून १५५४ कोटी रुपये इतकी आहे. त्यातील केवळ ९२.७४ कोटी रुपये पुन्हा वसूल करण्यात सरकारच्या कृषी विभागाला यश आले आहे. .https://sindhudurgsamachar.in/कामगार-दिनाच्या-हार्दिक/
किसान सन्मान निधीअंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटी १० लाख ५९ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. या योजनेच्या निकषानुसार आयकर भरणारी व्यक्ती, आमदार, खासदार, वकील डॉक्टर आदी या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. मात्र अशा अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसै जमा झालेले आहेत.
७/१२ वर करणार थकबाकीची नोंद
नोटिसा पाठवूनही या शेतकऱ्यांकडून दाद दिली जात नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ७/१२ वरच पैशांच्या थकबाकीची नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे बँकांकडून कर्ज घेताना तसेच जमिनीचे कोणतेही व्यवहार करताना या शेतकऱ्यांना पैसे जमा करूनच पुढचे व्यवहार करता येणार आहेत.



[…] […]