नाशिक – नाशिक शहराजवळील मालेगाव-नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात आज सकाळी पूर्ण वाढ झालेला बिबट्या शिरला. या कार्यालयात कु.मोहित आहिरे हा १२ वर्षीय मुलगा सोफ्यावर दरवाजाकडे तोंड करून मोबाईलवर खेळत बसला होता. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-श्री-अतुल-डांगे-यांची-आर/
कार्यालयाचा दरवाजा उघडाच होता . शेत वस्तीतील बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात मंगळवारी (ता. ५) सकाळी सातच्या सुमारास साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात दरवाजा उघडा असल्याने आत घुसला.
बिबट्याला आत येताना मोहितने पहिले. क्षणभर काय करावे या विचारात असतानाच मोहितने प्रसंगावधान दाखवत हळूच बाहेर जात कार्यालयाचा दरवाजा हलकेच ओढून घेतला.बिबट्याचे आत येताना मोहितकडे लक्ष नव्हते. मोहितने घरी धाव घेतली व वडील विजय आहिरे व कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने कार्यालयाची खिडकी उघडून पाहणी केली. खिडकीतून ब्लो पाईपने डार्ट देत बिबट्याला बेशुद्ध केले. मोहितच्या प्रसंगावधानाचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.कार्यालयातील सी सी कॅमेऱ्यामध्ये सदर घटना कैद झाली.