पुणे :-कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अग्रवालसह अन्य तिघांंनादेखील न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.https://sindhudurgsamachar.in/देशांतर्गत-टायर-उत्पाद/
⭐कोर्टात काय झाला युक्तीवाद?
विशाल अग्रवालला चौकशीसाठी पुणे पोलिसांकडून 7 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ती अमान्य करत विशाल अग्रवालसह अन्य तीन आरोपींना 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवार करण्यात आला. यावेळी पोलिसांनी विशाल अगरवाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली? मुलाला खर्च करण्यासाठी पॉकिट मनी कुठल्या स्वरूपात दिला? गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल अगरवाल हे फरार का झाले? यासह छ. संभाजी नगरमध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत? या सर्व गोष्टींचा तपास करणे आवश्यक आहे
⭐गुन्हा दाखल झाल्यानंतर अग्रवाल फरार झाले होते
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना अटक केली.
बाल न्याय अधिनियमाच्या ⭐75 आणि 77 अंतर्गत गुन्हा
मुलगा अल्पवयीन आहे याची माहिती असताना देखील त्याला कार चालवायला दिली तसेच तो दारू पितो हे माहिती असतानाही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिली. या कारणांमुळे विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमाच्या 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाला रेस्टॉरंटमध्ये मद्य देणाऱ्या रेस्टॉरंटसह त्याच्या वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगा मद्य घेत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनाही होती. त्याला मद्य पिण्यास परवानगी देण्यात आल्याप्रकरणी वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलायं. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनेचा तपास सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांचा शोध सुरु होता. मात्र, ते फरार झाले असल्याचं समोर आलं होतं.