Maharashtra:ठाण्‍यात ३२७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

0
33
अमली पदार्थ जप्त ,drugs,
ठाण्‍यात ३२७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

(न्यूज नेटवर्क) – –
मुंबई- देशभरात अमली पदार्थाची निर्मिती करून विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. एकूण ३२७ कोटीचा साठा जप्त करून १५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. ही टोळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा म्होरक्या सलीम डोळा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे https://sindhudurgsamachar.in/भाजप-नेते-लालकृष्ण-अडवाण/

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत पोलिसांकडून शहरात नाकाबंदी राबवण्यात येत होती. यावेळी १५ मे रोजी पोलीसांनी घोडबंदर येथील चेना भागात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. यात आरोपीकडून दोन कोटी किंमतीचे जवळपास एक किलो एमडी ड्रग्स पोलिसांना मिळाले होते.

यावेळी अधिक तपास केला असता अमली पदार्थाची मोठी टोळी सक्रिय असलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून वाराणसी, महाराष्ट्र , आणि गुजरात येथे शोध मोहीम राबवून अन्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात पैशाची देवाण-घेणाव व इतर गोष्टीमध्ये मुख्य सूत्रधार आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा मोरक्या सलीम डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर चौकशीअंती पोलिससांनी एकूण १५ आरोपीना अटक करून एकूण ३२७ किंमतीचे एम. डी जप्त केले. याशिवाय आरोपीकडून तीन पिस्तूल, एक रिवाल्वर आणि ३३ जिवंत काढत असे देखील हस्तगत करण्यात आले आहे.

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत असताना पैशाची देवाण-घेवाण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम चा मोरक्या सलीम डोळा हा गुजरातच्या सुरत येथील व्यापारी झूल्फीकार उर्फ मूर्तझा कोठारी मार्फत व्यवहार करत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कोठारीला ताब्यात घेऊन त्याकडून १० लाख रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच ही रक्कम मुंबईच्या मुस्तफा फर्निचर वाला या अंगडिया (हवाला ) मार्फत पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here