Maharashtra: सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक  स्कूटरवर खास ऑफर्स

0
21
टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरवर खास ऑफर्स,
सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरवर खास ऑफर्स, ग्राहकांना मिळणार ३०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक

ग्राहकांना मिळणार ३०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक

महाराष्ट्र , ९ ऑक्टोबर २०२४ –सणांचा काळ आपल्यासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येत असतो आणि तो द्विगुणित करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनी या दुचाकी व तीनचाकी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना टीव्हीएस इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्हेरिएंटवर ३०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफर्स ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरू राहाणार असून त्यामुळे ग्राहकांना भारताची आवडती कौटुंबिक ईव्ही केवळ ९०,६८१ रुपयांत (एक्स शोरूम किंमत महाराष्ट्र) मिळणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-टीव्हीएस-रेडिऑनची-नवी/

टीव्हीएस आयक्यूब एस व्हेरिएंटसाठी तमिळनाडू, पुदुच्चेरी, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्रमधील ग्राहकांना ५९९९ रुपयां मध्ये विस्तारित वॉरंटी/७००० किमी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळणार आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-जगातील-सर्वात-मोठा-१६-हज/

त्याव्यतिरिक्त टीव्हीएस आयक्यूब २.२ केडब्ल्यूएच व्हेरिएंटवर १७,३०० रुपयांपर्यंत आणि ३.४ केडब्ल्यूए व्हेरिएंटवर २०,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. १५ जुलै २०२२ पूर्वी टीव्हीएस आयक्यूब एस व्हेरिएंटचे प्री- बुकिंग केलेल्यांनाही ५.१ केडब्ल्यूएच किंवा ३.४ केडब्ल्यूएच एसटी व्हेरिएंटपैकी खरेदी करताना १०,००० रुपये लॉयल्टी बोनसचा लाभ होईल.

आकर्षक रिटेल वित्त सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या असून त्यात निवडक बँक कार्ड्सवर १०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, ७९९९ रुपयांपर्यंतचे लो डाउन पेमेंट आणि २३९९ रुपयांपर्यंतच्या सोप्या ईएमआयचा पर्याय यांचा त्यात समावेश आहे. यामुळे सणांच्या काळात टीव्हीएस आयक्यूबची खरेदी आकर्षक ठरणार आहे.

अशाप्रकारच्या ऑफर्समुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यास प्रोत्साहन मिळणार असून त्यातून टीव्हीएस मोटर कंपनीची शाश्वतता आणि अत्याधुनिक नाविन्याप्रती बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here