Maharrashtra: राज्यात ‘लाडकी बहीण’ची दलालांकडून आर्थिक लूट सुरु

0
33
माझी लाडकी बहिण योजना
सरकारकडून तुम्हालाही 'हा' मेसेज आला असेल तरच लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे!

⭐ कागदपत्रांसाठी ८०० ते १००० रुपयांची होतेय मागणी

अभिमन्यू वेंगुर्लेकर

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना अग्रस्थानी ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून कागदपत्रांसाठी राज्यातील ‘लाडकी बहिण’ची दलालांकडून आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस येत आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-माझ्या-कोकणाला-सुख-समृद्/

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर मंगळवार दि. २ जुलैपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अनेक कागदपत्रे एकत्र करावी लागणार आहेत. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच काही केंद्रावर एजंटकडून ८०० ते १००० रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे. दाखला मिळवण्यासाठी महा-ई सेवा केंद्रावर एजंटकडून तब्बल ८०० ते १००० रुपये घेतले जात असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here