Maharrashtra: जन्मतः हृदयविकार असलेल्या मुलांसाठी बीपीसीएलने मोफत बाल हृदय शस्त्रक्रिया करवून दिल्या

0
83

गरजू मुलांना मदत करण्यासाठी श्री श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल बरोबर भागीदारी

मुंबई: भारताचे एक ‘महारत्न’ आणि फॉरच्यून ग्लोबल ५०० कंपनी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जन्मतः हृदयविकार असलेल्या गरजू मुलांसाठी मोफत बाल हृदय शस्त्रक्रिया  करवून देण्यासाठी श्री श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाबरोबर भागीदारी केली आहेबीपीसीएल त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत जन्मजात हृदय दोष जागरूकता दिनानिमित्त ही वार्षिक मोहीम राबवित आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-ग्रामीण-महिलां/

४१०० पेक्षा जास्त मुलांनी या प्रकल्पाचा लाभ घेतला आहे आणि याद्वारे पुढील वर्षी ९०००-१२,००० मुलांवर उपचार होणे अपेक्षित आहे. बीपीसीएलने मुंबईतील रुग्णालयात सर्व महत्त्वपूर्ण वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत आणि आता त्यांनी १५० वंचित मुलांवर उपचार करण्याचे वचन दिले आहे; ज्यांच्यावर हरियाणा आणि छत्तीसगढ मधील साई संजीवनी रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जातील. त्यांनी सुरुवात केल्यापासून रुग्णालयात  आर्थिक दृष्ट्‍या मागास कुटुंबातील २४,००० हून अधिक मुलांवर उपचार करण्यात आले  आहे.

जन्मजात हृदय दोष जागरूकता दिवसाच्या स्मरणार्थ बीपीसीएल चे संचालक (विपणन) श्री. सुखमल जैन यांनी नवी मुंबईतील खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांसोबत संपूर्ण दिवस घालवला आणि त्यांच्या कुटुंबियांसह त्यांनी वार्तालाप केला.

महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील सात वर्षांची पूर्वी उदर हिने, जिला यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, पाहुण्यांसाठी एक कविता गायली आणि ती म्हणाली की ती मोठी झाल्यावर कॉर्पोरेट व्यावसायिक होऊ इच्छिते. ओरिसातील साडे तीन वर्षीय कीर्ती प्रभाचे पालक म्हणाले की, उपचारात्मक शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत करणारे हे रुग्णालय मिळण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण आशा सोडून दिली होती.

या प्रकल्पाच्या मूल्यांकनासाठी एक तृतीय पक्षी प्रभाव मूल्यांकन देखील  हाती घेण्यात आले होते. ज्यामध्ये बीपीसीएल द्वारे प्रदान केलेल्या नवीन प्रगत शस्त्रक्रिया उपकरणांमुळे शस्त्रक्रियांच्या यशाचा दर ९९% पर्यंत वाढला आहे असे दिसून आले. २०१८ पासून बीपीसीएल या उदात्त हेतूला अभिमानाने आणि सक्रियपणे पाठिंबा देत आहे आणि आतापर्यंत या छोट्या हृदयांची सेवा करत आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या अनुसूची VII मध्ये सूचीबद्ध केलेल्या बाबींसह आरोग्य व स्वच्छता, शिक्षण, समुदाय विकास, पर्यावरणीय शाश्वतता आणि कौशल्य विकास या पाच प्रमुख केंद्र स्थानी असलेल्या क्षेत्रांमध्ये बीपीसीएल सीएसआर उपक्रम राबवते.

कंपनीचा असा विश्वास आहे की, समाजऋण फेडणे महत्त्वाचे असते आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी ताळेबंदात सापडत नाही तर लहान शहरे व खेड्यांमध्ये त्यांनी हाती घेतलेल्या सीएसआर उपक्रमांमुळे उपेक्षित समुदायाला जो मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो त्यामधून दिसते.

बीपीसीएलने वर नमूद केलेल्या केंद्रस्थानी असलेल्या क्षेत्रांमध्ये शाश्वत विकास साधण्याच्या उद्दिष्टासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून अनुसूची VII मधील अन्य क्षेत्रांमध्ये देखील ते योगदान देत आहेत. कंपनी अनेक सक्षम संस्थांसोबत भागीदारी करते आणि त्याद्वारे समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना लाभ देणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देते. सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक विचारांवर आधारित सीएसआर उपक्रम हाती घेतले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here