मुंबई: देशात H3N2 विषाणूचा कहर सातत्याने वाढत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात H3N2 व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रात या विषाणूचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. देशात आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात H3N2 या विषाणूने एक विद्यार्थी आणि नागपूरमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी राज्यात आतापर्यंत या विषाणूचे 352 रुग्ण आढळले असल्याचे सांगितले आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-डॉ-बाळासाहेब-सावंत-कोकण/
या आजारामध्ये ताप,सर्दी,घास खवखवणे,हे सर्व लक्षणे कोरोनासारखीच दिसून येत आहेत.त्यामुळे नागरिकांनी मुखपट्टी,वारंवार हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे.
व्हायरसचा जास्त प्रभाव पुद्दुचेरी येथे दिसून येत आहे. त्यामुळे तेथील सर्व शाळा 16 ते 26 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदनगर, महाराष्ट्र येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला तरुण गेल्या आठवड्यात त्याच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी अलिबागला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याची प्रकृती ढासळू लागली. त्याला कोविड-19 आणि H3N2 विषाणूची लागण झाल्याचे तपासात समोर आले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.


