मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांची प्रकृती आता ठीक असून, लवकरच त्यांना घरी सोडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शाळेत-शिक्षकांना-जीन्स/
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन ८१ वर्षांचे असून गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले म्हणून कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी सहा वाजता त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.