Manoranjan: गुजराती चित्रपट ‘छेलो शो’चा बाल कलाकार राहुल कोळी याचं निधन

0
88

गुजराती चित्रपट ‘छेलो शो’चा बाल कलाकार राहुल कोळी याचं निधन झालं आहे. राहुल हा ल्यूकेमिया आजाराने पीडित होता. राहुल फक्त10 वर्षांचा होता.अहमदाबाद येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 2 ऑक्टोबर रोजी राहुलची प्राणज्योत मालवली.या चित्रपटाची ऑस्कर साठी निवड झाली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अज्ञात-गाडी-चालकाकडून-व/

राहुलला अधून मधून खूप ताप येत होता. नंतर तर त्याला रक्त्याच्या उलट्या सुरू झाल्या होत्या. त्याला अहमदाबाद येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याला ल्युकेमिया आजार होता. उपचार सुरू असताना 2 ऑक्टोबरला त्याचं निधन झालं.असे राहुलच्या वडिलांनी सांगितले.राहुलचे वडील ऑटो रिक्क्षाचालक आहेत. राहुलने हा तीन भावांमध्ये सर्वात मोठा होता.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्यातील-नवउद्योजक/

येत्या 14 ऑक्टोबरला ‘छेलो शो’ रिलीज होणार आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्याआधील बाल कलाकार राहुल कोळी यांच्या निधनाची बातमी आल्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. रामू कोळी यांनी सांगितले, छेलो शो मध्ये राहुल याने मनुची भूमिका साकारली आहे. चित्रपट रिलीज होणार म्हणून राहुल खूप आनंदी होता. 14 ऑक्टोबरला त्यांचा चित्रपट पडद्यावर झळकणार होता. या चित्रपटाने आपलं आयुष्य बदलून जाईल, असं तो नेहमी म्हणत होता. परंतु, त्याआधीच त्याने आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला.चित्रपट निर्माते नलिन म्हणाले, राहुलच्या निधनाचे वृत्त सगळ्यांनाच दुःखी करणारे आहे. आम्ही राहुलच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे देखी नलिन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here