दिल्ली – फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाच्या भारताच्या प्रमुख म्हणून संध्या देवनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संध्या यांच्याकडे मेटाच्या आशिया पॅसिफिकच्या गेमिंग व्यवसायाची जबाबदारी आहे, जानेवारी महिन्यात त्या भारताच्या प्रमुख आणि मेटाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारतील. देवनाथन फसेबूकमध्ये २०१६ पासून काम करत आहेत .साऊथ ईस्ट आशियासाठी काम करत असताना त्यांनीच सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये फसेबूकचा कारभार वाढविण्यास हातभार लावला होता.
मेटामधून काही दिवसांपूर्वी ११ हजार कर्मचारी कमी करण्यात आले. त्यानंतर भारताचे प्रमुख अजित मोहन, व्हॉटसअपचे भारताचे प्रमुख अभिजित बोस, सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख राजीव अग्रवाल यांनी काही दिवसापूर्वीच राजीनामा दिला आहे.
संध्या यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीएम केले आहे, तसेच आंध्र विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. फेसबुकमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी पेपर फायनान्सियल सर्व्हिसमध्ये संचालक आणि नॅशनल लायब्ररी बोर्डमध्ये काम केले आहे.

