महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रोन या विषाणूचे संक्रमण वाढत चालले आहे. आता अचानक दैनंदिन कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या 24 तासांत 3, 900 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईमध्ये 2,510 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईची रुग्णसंख्या एक दिवस आधी आढळलेल्या रुग्णांपेक्षा ही रुग्णसंख्या जास्त आहे.
28 डिसेंबरला महाराष्ट्रात 2,172 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. तर मुंबईत 1,333 रुग्णांची नोंद झाली होती. तर दुसऱ्या दिवशीच म्हणजे 29 डिसेंबरला रुग्णसंख्यात मोठी वाढ पहायला मिळाली. राज्यात 3, 900 तर मुंबईमध्ये 2,510 रुग्णांची नोंद झाली. या दोघांची तुलना केली तर 29 डिसेंबरची रुग्णसंख्या जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे याच पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा देखील दिला आहे


