संयुक्त राष्ट्र महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार संबोधित केले.
चीन आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष याआधीच बोललेले होते.त्यामुळे मोदींनी आपल्या संबोधनातुन या दोन्ही देशांना जागतिक मंचावरुन उत्तर दिलेच, पण संयुक्त राष्ट्रात सुधारणांची किती गरज आहे देखील स्पष्ट केले
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी काश्मीर आणि अफगाणिस्तानवर बोलताना भारताच्या काश्मीर प्रश्नावर आणि दहशदवाद यावर बोलले होते. मोदी जेव्हा शनिवारी बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी पाकिस्थान आणि चीन या दोघांनाही जे देश दहशतवादाचा वापर पॉलिटिकल टूलप्रमाणे करत आहेत, त्यांनी समजून घेतले पाहिजे की, जेवढा जगाला दहशतवादाचा धोका आहे, तेवढाच मोठा धोका त्यांच्यासाठी देखील आहे असे सडेतोड उत्तर दिले.
पाकिस्तान सतत अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप करत असून पंजशेरमध्ये त्यांनी तालिबानला मदत करण्यासाठी एयरफोर्सचा गुप्तपणे वापर केला. तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेवून इम्रान खान जगाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवाद आणि दहशतवादी हल्ल्यासाठी केला जाऊ शकत नाही याचा निर्णय घेतला पाहिजे. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की एक देश आपल्या स्वार्थीपणासाठी अफगाणिस्तानचा वापर करू शकत नाही. यावेळी, अफगाणिस्तानच्या महिला, मुले आणि अल्पसंख्यकांना मदतीची गरज आहे आणि यामध्ये आपल्याला आपली जबाबदारी निभवावी लागेल असेही मोदींनी स्पष्ट केले.
त्याशिवाय चीनचा हिंद आणि प्रशांत महासागरमध्ये वाढत चालेल वापर आणि रोज नवीन योजनांच्या माध्यमातून दबदबा वाढवण्याचे कट रचत असून या क्षेत्रातील छोट्या देशांवर दबाव टाकत आहे. त्याचा सामना करण्यासाठी क्वॉड आणि ऑकस संघटना बनल्या आहेत.आपले महासागर देखील आपला वारसा आहे. लक्षात ठेवा की ओशन रिसोर्सेजचा आपण ‘यूज करावा, एब्यूज नाही’. समुद्र इंटरनॅशनल ट्रेडची लाइफलाइन आहे. त्यांना एक्सपान्शन (विस्तार) आणि एक्सक्लूजन (कटिंग) पासून वाचवणे आवश्यक आहे. नियमांचे पालन आवश्यक आहे. त्यासाठी जगाला एकत्र आवाज उठवावा लागेल असेही ते म्हणाले.
सुरक्षा परिषदेमध्ये अद्याप पाच देश आहेत. भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सदस्यतेमध्ये चीन आडकाठी आणण्यात गुंतला आहे. वीटोचा वापर केला जात आहे. हे पाच देश एक प्रकारे वर्ल्ड ऑर्डर ठरवत आहेत. जेव्हा योग्य गोष्ट योग्य वेळी केली जात नाही, तेव्हा वेळच त्या कामाचे यश काढून टाकते. संराला प्रासंगिग बनवायचे असेल तर त्याला इफेक्टिव्हनेस आणि विश्वास वाढवावा लागेल. UN वर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. हवामान संकट आणि कोव्हीडच्या काळात आम्ही या प्रश्नांचा सामना केला. हवामान संकट, अफगाणिस्तान, प्रॉक्सी युद्ध आणि दहशतवादाच्या काळात हा प्रश्न गहन झाला आहे असेही ते म्हणाले..
भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेवेळी व्हॅक्सीन निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे जगावर सर्वात मोठे संकट उभे राहिले होते. श्रीमंत देशांवर आरोप लागले की, त्यांनी लसींचा ओव्हर स्टॉक केला आणि गरीब देशांना वाऱ्यावर सोडले. भारताने DNA व्हॅक्सीन तयार केली आहे. RAN आणि नेजल व्हॅक्सीनचे काम अंतिम टप्प्यावर आहे. भारत पुन्हा एकदा जगाविषयी जबाबदारी निभावण्यासाठी तयार आहे, यासाठी पुन्हा व्हॅक्सीन एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे असेही सांगितले..