मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात चर्चेत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात म्हणून केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांना क्लिनचिटही देण्यात आली होती. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-सीतरंग-चक्रीवा/
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातला तपास आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या आता पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्या महासंचालक पदासाठी पात्र ठरत नव्हत्या. https://sindhudurgsamachar.in/bollywood-अभिनेता-सलमान-खान-याच्य/
मात्र त्यांना आता राज्य सरकारने अभय दिलं आहे. त्यामुळे आता शुक्ला केंद्रात पोलीस महासंचालक पदी पात्र ठराव्यात या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्रात महासंचालकपदी पात्र ठरल्यानंतर त्यांचा राज्याच्या पोलीस सेवेत महासंचालकपदी येण्याचा मार्ग खुला होणार आहेत. सध्या मुंबई पोलीस आयुक्तपदी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कुडाळ-मालवणचे-आमदार-वैभ/


