Ratnagiri: चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

1
269
चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दापोली- दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा चंद्रनगर येथे स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन समारंभपूर्वक व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांचे हस्ते शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-तब्बल-साडेआठ-लाखांचा-मु/

चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यावेळी चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, पोलीस पाटील गौरी पागडे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राकेश शिगवण, माजी सरपंच अर्जुन पागडे, सदानंद मुलूख, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष विजय मुलूख, शैलेश मुलूख, सुनिल रांगले, शाळेच्या मुख्याध्यापक रीमा कोळेकर, ग्रामसेवक संदीप सकपाळ, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केले.

याशिवाय सामुदायिक साहित्य कवायत प्रकार व संचलन पाहून उपस्थित सर्वांनी शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त शाळेत वक्तृत्व, रांगोळी, निबंधलेखन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत व सत्कार कार्यक्रमात कला, क्रीडा, सांस्कृतिक, नासा-इस्रो, शिष्यवृत्ती, गीतगायन, प्रश्नमंजुषा, हस्तकला आदी स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्यानिमित्ताने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, मनोज वेदक व अर्चना सावंत यांनी केले.

1 COMMENT

  1. May I simply say what a relief to uncover a person that genuinely understands what theyre discussing on the internet. You definitely realize how to bring an issue to light and make it important. A lot more people ought to read this and understand this side of your story. I cant believe you are not more popular because you definitely possess the gift.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here