दापोली– दापोली येथील श्री गजानन महाराज भक्त मंडळ गिम्हवणे या संस्थेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा चंद्रनगर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक पारितोषिके पटकावून सुयश संपादन केले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-व्हेल-माशाची-उलटी-समुद्/
श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून गिम्हवणे येथील गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज भक्त मंडळ दरवर्षी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करते. तालुक्यातील व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव व संधी मिळावी यासाठी या मंडळाच्या वतीने गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
यावर्षी आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा, हस्ताक्षर, निबंधलेखन, पाठांतर, उतारावाचन, हस्तकला, चित्रकला, रंगभरण, रांगोळी, देशभक्तीपर गीतगायन, समूहनृत्य गायन व सादरीकरण, एकपात्री अभिनय, शेतकरी गीतगायन व सादरीकरण आदी स्पर्धांमध्ये चंद्रनगर शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांत पारितोषिके पटकावून घवघवीत यश संपादन केले. चंद्रनगर शाळेतील या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, मुख्याध्यापक रीमा कोळेकर आदींनी अभिनंदन केले आहे. या सर्व स्पर्धांसाठी शाळेतील शिक्षक अर्चना सावंत, मानसी सावंत, बाबू घाडीगांवकर, मनोज वेदक, व पालकांनी मेहनत घेतली.


