Ratnagiri: परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद करणार?

0
87
परशुराम घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद करणार?

चिपळूण– मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह मातीच्या भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरू झाला आहे. प्रशासन या बाबतचा निर्णय लवकरच घेईल, अशी शक्यता महामार्गाच्या सूत्राकडून मिळत आहे.

महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदी करण्यासाठी गेले वर्षभर काम सुरू आहे घाटात डोंगर कापताना यापूर्वी अपघात घडल्याने महिनाभर घाटातील वाहतूक बंद ठेवून कामे करण्यात आली त्यानंतर पावसाळ्यात पोखरलेले डोंगर खचल्याने अतिवृष्टीत घाट पुन्हा बंद ठेवावा लागला परिणामी अवजड वाहतूक बंद ठेवून ती कळंबस्ते मार्गे लोटकडे वळवण्यात आली. अर्धव स्थितीत असलेला हा घाट पावसाळ्यात दरडी खाली आल्याने या घाटातील वाहतूक जवळपास महिनाभर अधिक काळ बंद ठेवण्यात आली मात्र आता पुन्हा घाटातील काम सुरू होत आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या डोंगर कापण्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याने घाटातील वाहतुकीला त्यांचा कोणत्याही फटका बसू नये या दृष्टीने तसेच घाटातील चौपदरीकरण भराव व रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक काही दिवस बंद ठेवावी लागणार आहे. या याबाबत अधिकृत निर्णय झालेला नसला तरी त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करत असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here