रत्नागिरी, (प्रतिनिधी) : शहरानजीकच्या भाट्ये- खोतवाडी येथे चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला जबर मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मारहाणीची घटना रविवारी रात्री १२ ते मंगळवार १८ जुलै या कालावधीत घडली आहे. https://sindhudurgsamachar.in/ratnagiriरेल्वे-प्रवासात-५२-हजार/
संतोष शांताराम हरमले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती संतोष हा तिच्यावर सतत संशय घेत असतो. यातूनच त्याने १६ ते १८ जुलै या कालावधीत पत्नीला सतत मारझोड करुन दोन्ही डोळ्यांना दुखापत केली आहे. या मारहाणीत पीडित पत्नीला दोन्ही डोळ्यांनी दिसायचे कमी झाले असून डोक्याला आणि सर्व शरीराला मुका मार लागला आहे..


