Ratnagiri: मकर संक्रातीनिमित्त दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या निवेदनाला दापोलीतून महिलांचा मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

0
108
मकर संक्रातीनिमित्त दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या निवेदनाला दापोलीतून महिलांचा मिळाला उस्फुर्त प्रतिसाद

दापोली- मकर संक्रातीनिमित्त आपल्या काळ्या वेशभूषेतील फोटो‘ कार्यक्रमात दापोलीतून महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सौ. कविता बाबू घाडीगांवकर, दापोली, सौ. अलका जळणे, दापोली, सौ. सारा मोरे, दापोली या महिलांनी मकर संक्रातीनिमित्त आपल्या काळ्या वेशभूषेतील फोटो‘ सदर कार्यक्रमात भाग घेऊन काळ्या साडीतील फोटो आम्हाला पाठवले. याबद्दल दैनिक सिंधुदुर्ग समाचारच्या वतीने धन्यवाद आणि अभिनंदन !

मकर संक्राती हा सण सात दिवस हळदीकुंकू आणि एकमेकांना तिळगुळ देऊन “तिळगुळ घ्या गोड बोला’ असे म्हणत साजरा केला जातो. रथसप्तमीला या सणाची सांगता होते. या दिवशी काळ्या कपड्यांना महत्व आहे. त्यामुळे या दिवशी शक्यतो काळे कपडे परिधान केले जातात. आपले सण, त्यांचे महत्व येणाऱ्या पिढीलाही कळावे आणि त्यामागची परंपरा ,मजा घेता यावी यासाठी हा प्रयत्न!

मकर संक्रातीनिमित्त आपल्या काळ्या वेशभूषेतील फोटो आमच्या वेबसाईटवर आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. आपल्या कुटुंबियांसोबत अथवा मित्र- मैत्रिणीं सोबत जर तुम्हाला आमच्या वेबसाईटवर चमकायचे असेल तर वाट कसली पाहता क्लिक करा आणि तुमचे नाव,ठिकाण सहित आम्हाला रथसप्तमीपर्यंत शेअर करा.(sindhudurg.samachar@gmail.com)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here