Ratnagiri: रेल्वे प्रवाशाच्या खिशातून सोन्याचे दागिने लंपास

1
223
रेल्वे प्रवाशाच्या खिशातून सोन्याचे दागिने लंपास

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी– मडगाव ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करताना पँटच्या खिशात ठेवलेले दागिने लंपास झाल्याचा प्रकार १९ डिसेंबर रोजी रात्री ११:४५ वाजता घडला . रत्नागिरी रेल्वेस्थानकात गाडी आली असता हा प्रकार लक्षात आला , या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात २४ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/गोवा-कर्ज-देण्याचे-आमिष-द/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सुंदर दिनकर देसाई ( ४७ , रा . काल्हेर , ता . भिवंडी , ठाणे ) हे १९ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून मडगाव ते मुंबई असा प्रवास करत होते . प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या गळ्यातील दागिने एका पिशवीत बांधून ट्रॅक पँटच्या खिशात ठेवले होते . गाडी रत्नागिरी रेल्वेस्थानकात आली असता ते बसलेल्या जागेवर आरक्षण असलेली व्यक्ती आली . त्यांनी सुंदर देसाई यांना उठविले असता , देसाई यांनी झोपेतच पँटच्या खिशात हात घालून पाहिले . त्यावेळी त्यांना दागिने असलेली पिशवी सापडली नाही . पोलिस अधिक तपास करीत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here