प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे वरील छायाचित्रातील व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत नाष्टा देण्याचं काम करतात . त्यांच्या जवळ जाऊन अधिक माहिती घेतली तर कळलं की ते हे काम गेली दोन अडीच वर्ष करत आहेत सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळ ८० लोकांना पुरेल असा वेगवेगळा नाष्टा बनऊन ते आणतात त्याच बरोबर केळी, सफरचंद, मोसंबी अशी फळे ह दिली जातात. हा उपक्रम मुंबई येथील विथ आर्या संस्था*राबविते त्यांच्या कडून दरमहा आम्हाला झालेला खर्च दिला जातो आम्ही ही सेवा भावाने दररोज हा उपक्रम चालवतो असे ते म्हणाले ऐकून खूप समाधान वाटले ज्याची रुग्णांना गरज आहे ते देण्याचा प्रयत्न या संस्थे कडून केला जातो जिल्हा भारातून येणारे गोर गरीब रुग्ण याचा फायदा घेत असतात.