दापोली- डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, ग्रामपंचायत चंद्रनगर आणि जिल्हा परिषद मराठी शाळा चंद्रनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथे नुकताच जागतिक नारळ दिन नारळाशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, चंद्रनगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनोद शिगवण, डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डाॅ. देवगिरीकर, डाॅ. वरवडेकर चंद्रनगर मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-निरवडेतील-भजन-स्पर्धेत-आ/
डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ‘ कृषीपर्व ‘ च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या कार्तक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डाॅ. देवगिरीकर व डाॅ. वरवडेकर यांनी नारळ हे कोकणचे वैभव असून तो कसा ‘ कल्पवृक्ष ‘ आहे याविषयी सविस्तर व उपयुक्त माहिती सांगून चंद्रनगर गावातील सर्व शेतकऱ्यांना नारळाची जास्तीत जास्त क्षेत्रात लागवड करण्याचे आवाहन कले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने चंद्रनगर गावातील महिलांसाठी नारळापासून बनविलेल्या विविध पाककृतींचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाककृती स्पर्धेसाठी चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विजय मुलूख, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ पागडे, प्रा. डाॅ. वरवडेकर व डाॅ. देवगिरीकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
पाककृती स्पर्धेत स्नेहा मुलुख यांच्या सेंद्रिय गुळापासून बनविलेल्या नारळाच्या मोदकांना प्रथम क्रमांकाचे, दर्शना पागडे यांच्या नारळी भातास द्वितिय क्रमांकाचे तर भक्ति मुलूख यांनी बनविलेल्या नारळाच्या मोदकांना तृतिय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. चंद्रनगर मराठी शाळेत साजरा झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वेदक यांनी केले तर ‘ रावे ‘ च्या विद्यार्थ्यांनी सर्व सहभागी उपस्थितांचे आभार मानले. चंद्रनगर गावातील अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिद्धिविनायक साळुंके, जयसिंगराव चव्हाण, हरीश बागूल, मयुरेश गोडसे, अभिषेक पाटील, सुधांशु गोलामडे, तुषार तांडेल, अभिराज खरात, प्रथम साखळकर, समर्थ कावळे, मयूर सुरवसे, उदय अरोटे, प्रथमेश सपकाळे, धैर्यशील पाटील, प्रवीणसिंह जाधव, विनायक पिसे, तेजस बायस्कार, संघर्ष तायडे या ‘ रावे ‘ च्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.