दापोली- दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव म्हणजेच ‘ रावे ‘ उपक्रमांतर्गत येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे दोन दिवस केलेल्या श्रमदानातून फळभाज्यांची परसबाग साकारली आहे. विद्यार्थ्यांच्या या श्रमदानातून केलेल्या नवनिर्मितीचे चंद्रनगर येथील ग्रामस्थ व पालकांनी कौतुक केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेनेशी-निष्ठावंत-राह-2/
‘ रावे ‘ या कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयातील जयसिंगराव चव्हाण, हरीश बागुल, मयुरेश गोडसे, अभिषेक पाटील, सुधांशु गोलामडे, तुषार तांडेल, अभिराज खरात, प्रथम साखळकर, सिद्धिविनायक साळुंके, समर्थ कावळे, मयुर सुरासे, उदय अरोटे, प्रथमेश सपकाळे आदी विद्यार्थ्यांनी तालुक्यातील चंद्रनगर जिल्हा परिषद शाळेच्या आवाराची श्रमदानातून साफसफाई केली आहे. शालेय आवारात त्यांनी वांग्याच्या रोपांची लागवड करून सुंदर परसबागही फुलवली आहे.
शालेय आवारातील मोकळ्या जागेत या विद्यार्थ्यांनी नाचणी या सात्विक तृणधान्याचीही लागवड केली आहे. ‘ रावे ‘ उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गटवार चित्रकला व तृणधान्य ओळख स्पर्धा आयोजित करून स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप केले आहे. ‘ रावे ‘ उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक अर्चना सावंत, मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ‘ रावे ‘ उपक्रमासाठी चंद्रनगर शाळेची निवड केल्याबद्दल शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्य