दापोली- : भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारंभानिमित्त चंद्रनगर शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. १५ ऑगस्ट रोजीच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षणतज्ञ श्रीधर जाधव यांचे हस्ते शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-देशभक्तिपर-समूहगान-स्प/
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, पोलीसपाटील गौरी पागडे, चंद्रनगर तंटामुक्ती समिती अध्यक्ष विनोद शिगवण, चंद्रनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विजय मुलूख, कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सदानंद मुलूख, सचिव शैलेश मुलूख, ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुनिल रांगले, चंद्रनगर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, ग्रामसेवक संदीप सकपाळ, अंगणवाडी सेविका आशा मुळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी चंद्रनगर गावातील सर्व ग्रामस्थ, नागरिक व विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित आर.टी.एस., रत्नागिरीचा भास्कराचार्य, शोध कलारत्नांचा या स्पर्धेत यश संपादन केलेल्या व रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक व सन्मानपत्रांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, घोषवाक्य, तृणधान्य ओळख, वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक अर्चना सावंत, मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत तसेच ग्रामस्थ व पालकांनी मेहनत घेतली. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘ रावे ‘ उपक्रमातील विद्यार्थ्यांनीही चंद्रनगर शाळेतील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत कार्यक्रमांच्या आयोजनात सहभाग घेतला होता.