Ratnagiri: दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार, संशयित लेखापालवर गुन्हा दाखल; आकडा वाढण्याची शक्यता

0
45
दापोली नगर पंचायतीत ५ कोटींचा अपहार

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

दापोली- दापोली नगर पंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांनी सुमारे ५ कोटी ८१ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अपहाराचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात दीपक दिलीप सावंत (४४, रा. काळकाई कोंड, दापोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-कोंकणातील-पहिला-सर्वात/

याप्रकरणी नगर पंचायतीचे लेखापाल सिद्धेश विश्वनाथ खामकर यांनी फिर्याद दिली आहे. दापोली नगर पंचायतीचे तत्कालीन लेखापाल सावंत यांनी आर्थिक वर्ष २०२१ ते २०२२ या कालावधीत हा अपहार केल्याचे कार्यालयीन चौकशी समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी हा अपहार उघड करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-फिनोलेक्स-इंडस्ट्रीज-आ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here