Ratnagiri: देशभक्तिपर समूहगान स्पर्धेत चंद्रनगर शाळेचे यश

0
62
देशभक्ति, समूहगान ,चंद्रनगर
देशभक्तिपर समूहगान स्पर्धेत चंद्रनगर शाळेचे यश

दापोली- भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी लायन्स क्लब दापोली आयोजित देशभक्तिपर समूहगान स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा चंद्रनगर या शाळेने लहान व मोठ्या गटात यश संपादन केले असून चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-चंद्रनगर-शाळेत-रावे-चे/

लायन्स क्लब दापोली ही संस्था गेल्या बेचाळीस वर्षांपासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तिपर समूहगान स्पर्धा आयोजित करते. यावर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा चंद्रनगर या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेने लहान गटात द्वितिय तर मोठ्या गटात उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. रोख रक्कम, सन्मानपत्र आणि सन्मानचषक असे या बक्षीसांचे स्वरूप आहे. डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संजय भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पारितोषिकांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.

चंद्रनगर शाळेतील शिक्षक मानसी सावंत, अर्चना सावंत, बाबू घाडीगांवकर, मनोज वेदक तसेच रोहित शिंगे व सौरभ वेलणकर यांचे संगीत विषयक मार्गदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांना लाभले होते. चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here