- -प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरण काम अंतर्गत परशुराम घाटात डोंगर कटाई व सपाटीकरणाचे काम वेगात सुरू आहे. गुरुवारी सकाळी परशुराम घाटात दराडीचा काही भाग कोसळला. मात्र यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. काही काळ महामार्गावरील वाहतूक मात्र विस्कळीत झाली.
मुंबई – गोवा महामार्गाचे काम सध्या परशुराम घाटात वेगाने सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून डोंगरकटाई व सपाटीकरणाबरोबरच रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे सुरू असताना पेढे वस्तीत दगड कोसळण्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यामध्ये काहींच्या घरांचे नुकसान झाले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली. ही दरड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. नंतर ठेकेदार कंपनीने जेसीबी व पोकलेनच्या साह्याने ही दरड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली.