Ratnagiri: पाणी समजून सॅनिटायझर प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

0
15

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी– तालुक्यातील वाटद – खंडाळा येथे पाणी समजून सॅनिटायझर प्राशन केलेल्या विवाहितेचा जिल्हा शासकिय रुग्णालयात बुधवार १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला . याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकिस्मक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे .https://sindhudurgsamachar.in/शेतकरी-कष्टकरी-प्रकल्पग/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तुलसीदास पदम लामा ( २७ , मुळ रा . नेपाळ सध्या रा . वाटद खंडाळा , रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे . याबाबत तिचा पती पदम राम बहाद्दूर लामा ( २६ , मुळ रा . नेपाळ सध्या रा . वाटद खंडाळा , रत्नागिरी ) याने जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली.त्यानूसार , मंगळवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा . तुलसीदास हिने राहत्या घरी पाणी समजून सॅनिटायझरचे प्राशन केले होते . त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने पतीने तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते . परंतू उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल किशोर धातकर करत आहेत.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-दापोली-नगर-पंचायतीत-५-को/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here