शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास
प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
राजापूर : राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांतर्गत माती सर्वेक्षणाचे काम मंगळवारी दुपारपासून सुरु करण्यात आले. या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी सोमवार पासूनच बारसू येथील सड्यावर शेकडो ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले आहेत. आज त्याठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्या ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेत शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-पावशी-येथे-सोहम-तेजस-स्पो/
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, लोकसभा सह संपर्कप्रमुख सुधीर मोरे, लोकसभा समन्वयक राजेंद्र महाडिक, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, प. स. सदस्य प्रकाश गुरव, समन्वयक प्रकाश कुवळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.