Ratnagiri – राई-भात गाव पुलाजवळ गोणीत सापडलेला मृतदेह बेपत्ता सोने व्यापाऱ्याचा?

0
115
राई-भात गाव पुलाजवळ गोणीत सापडलेला मृतदेह बेपत्ता सोने व्यापाऱ्याचा?

रत्नागिरी प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर. गुहागर तालुक्यातील आबलोली – खोडदे मार्गावरील पुलाजवळ बुधवारी गोणी मध्ये मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेतील गोखले नाक्यावरून बेपत्ता झालेले मुंबईतील प्रसिद्ध सोने – हिरे व्यापारी कीर्ती कोठारी यांचा असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
सोमवारी व्यापारासाठी रत्नागिरी मध्ये आलेले सोने व्यापारी कीर्तिकुमार कोठारी हे त्याचं दिवशी रत्नागिरी शहरातील गोखले नाक्यावरन बेपत्ता झाले होते. त्यांचा वावर अनेक दुकानाच्या सिसिटीव्ही मध्ये दिसून आला आहे. मात्र गोखले नाका येथे आल्यानंतर पुढे त्यांचा मागमूस लागत नव्हता त्यांची बुधवारी सकाळी बेपत्ता म्हणून तक्रार त्यांच्या मुलाने शहर पोलीस स्थानकात दिली होती. पण घातपात यां दिशेने पोलीस तपास करत असून यां प्रकरणी पोलिसांनी रत्नागिरी शहरातील एक सोने व्यापारी, एक रिक्षा चालक आणि तिसऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर गुहागर आणि रत्नागिरी तालुक्याना जोडणाऱ्या राई- भात गाव पुलाच्या मार्गांवर खोडदे – आबालोली येथे एका गोणीत एक मृतदेह आढळला असून तो मृतदेह कोठारी यांचा आहे का असा संशय व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here