संगमेश्वर : सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ फेपडे यांचे मंडळाचे अध्यक्ष यांनी केले विषेश कौतूक
संगमेश्वर श्री हनुमान नवरात्र उत्सव मंडळ फेपडे वाडी मानसकोंड वर्ष 14 वे या मंडळ तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते . विशेष बाब म्हणजे या मंडळातर्फे आरोग्य आणि शिक्षण या विषयावर अधिक भर देण्यात येतो. प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी मंडळातर्फे संगमेश्वर येथील ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटल संगमेश्वर येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली.या मोहीमेतील सहभागी महिला आणि पुरुष यांचे करिता तेथील तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्यचिकित्सा (तपासणी) मार्गदर्शन शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर अभिजीतमोरे सर यांचे आरोग्य विषयी आजार आणि उपचार या विषयी उत्तम मार्गदर्शन केले
या वेळी मंडळाचे अध्यक्ष यांनी सर्व कमिटी सदस्य आणि शिबीर सहयोगी ग्रामस्त आणि शिबीर यशस्वी करण्यात विषेश सहकार्य लाभले ते धडाडीचे सामाजीक कार्यकर्ते श्री काशिनाथ फेपडे यांचे मंडळाचे वतीने आभार व्याक्त कले काशिनाथ फेपडे यांच्या सामाजिक कार्याच सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

