प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
रत्नागिरी– २४ फेबृवारी २०२३ रोजी पतितपावन मंदीर येथे होणाऱ्या सर्व समाजांच्या एकत्रीत सहभोजनाच्या नियोजनाची बैठक आज पतितपावन मंदीर येथे पार पडली .
महामानव दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या निधनानंतर पतितपावन मंदीरातील बंद पडलेला सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ , पतीतपावन मंदीर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ यांच्या माध्यमातुन पुन्हा सुरु होणार आहे . या कार्यक्रमासाठी सहभोजन व भजन कमिटी बनविण्यात आली आहे . ५० निवडक कार्यकर्त्यांची आज प्राथमिक नियोजनाची बैठक पतीतपावन मंदीरामध्ये पार पडली . सर्व कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक नितीन तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कमिटीची स्थापना करण्यात आली. भंडारी समाजाचे अध्यक्ष रुपेंन्द्र शिवलकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाची जबाबदारी देवुन सहभोजनाचे नियोजन समजवुन सांगितले . कार्यकर्त्यांच्या आलेल्या सुचनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली .
त्याकाळी देश स्वतंत्र करण्यासाठी स्पृश्य अस्पृश्य भेदभाव मिटविण्यासाठी सहभोजनाची आवश्यकता होती . परंतु आता देशभक्ती , धर्माचे रक्षण आणि प्रामाणिकपणा दानशुरता अंगीकारण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे राजीव कीर यांनी सांगितले. त्यासाठी हा सहभोजन कार्यक्रम आदर्शवत ठरेल तसेच कर्णालाही लाजवेल असे भागोजीशेठ कीर यांचे कार्य भजनाच्या माध्यमातुन जनतेसमोर मांडण्यात येणार आहे . भागोजीशेठ कीर यांचे कार्य सर्व समाजांच्या माध्यमातुन पुढे नेले जाणार आहे. यावेळी पतितपावन ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शिंदे , मंदार खेडेकर,भंडारी समाजाचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर , राजीव कीर , नितीन तळेकर , बाबा नागवेकर , संपदा तळेकर , पल्लवी पाटील , सुश्मिता सुर्वे , जयेश गुरव , सौ दया चवंडे , सौ मनिषा बामणे , दिलीप मयेकर , विनोद वायंगणकर , बंटी कीर, राजन शेट्ये , कृष्णकांत नांदगावकर ,सुरेंद्र घुडे , अनिकेत कोळंबेकर , अजिंक्य डोंगरे , मुकुंद विलणकर , रोहीत पवार ,सौ रीमा पवार , सौ प्राजक्ता उभारे , सुषमा तांबे , दिपक गोवेकर , सागर सुर्वे , अमित विलणकर , सत्यवान बोरकर यांच्यासहीत अनेक कार्यकर्ते बंधु भगिनी उपस्थित होते .
या सहभोजनासाठी सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष श्री सुभाष मयेकर यांनी ३०० किलो तांदुळ दिला आहे तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ५० किलो तुरडाळ आणि ५० किलो कडधान्य देवू केले आहे . सहभोजनासाठी लागणारे लोणचे भिडे उद्योग समुहाकडुन देण्यात आले आहे . अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांच्याकडुन ५१०००/- ची देणगी जाहीर करण्यात आली आहे.