Ratnagiri News: कोकणातले गेले पुण्यात व्हेल माशाची ‘उलटी’ विकायला; पोलिसांनी केली अटक

1
52
व्हेल माशाची 'उलटी

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी– वेल माशाच्या उलटीची अवैधपणे विक्री केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मागणी आहे. त्याला कोट्यवधी रुपयांची किंमत मिळते. पालघर व आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात याची तस्करी केली जाते. मात्र रत्नागिरी व दापोलीतून दोघेजण याची विक्री करण्यासाठी थेट पुण्याला गेले होते.

पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत अजून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र राकेश कोरडे (वय २८, रा. मु.पो. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी), नवाज अब्दुला कुरुपकर (वय २४), अजिम महमुद काजी (वय ५०, दोघे रा. मु.पो. अडखळ, जईकर मोहल्ला, अंजर्ले, ता. दापोली), विजय विठ्ठल ठाणगे (वय ५६), अक्षय विजय ठणगे (वय २६ दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी विक्री करण्यासाठी आणलेल्या वेल माशाच्या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किमत तब्बल पाच कोटी रुपये आहे.आरोपींवर डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here