रत्नागिरी- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रथम वर्ष आर्टिफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी, सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्ष (CET CELL) यांच्या मार्फत पार पडलेल्या प्रवेश फेरीनंतर शिल्लक (ACAP) राहिलेल्या जागेवर प्रवेशासाठी समुपदेशन पद्धतीने गुरुवार २४ ऑगस्ट २०२३ रोजी समुपदेशन (ON THE SPOT ADMISSION by Counselling) प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-किशोर-तावडे-सिंधुदुर्गा/
प्रवेशाबाबत अधिकची माहिती संस्थेच्या https://www.gcoer.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या फेरीसाठी संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नावनोंदणी करून आवश्यक मूळ प्रमाणपत्र व प्रवेश फी सह स्वतः २४ ऑगस्ट २०२३ रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे उपस्थित राहावे, असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.