Ratnagiri: कोंकणातील पहिला सर्वात मोठा कोच व व्हील बनविण्याचा सरकारी कारखाना सुरेश प्रभुमुळे प्रगती पथावर – अँड विलास पाटणे

0
41
कोंकणातील पहिला सर्वात मोठा कोच व व्हील बनविण्याचा सरकारी कारखाना सुरेश प्रभुमुळे प्रगती पथावर

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी – मा.नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात रेल्वे मंत्री सुरेश प्रभुंनी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या रेल्वेला आधुनिकतेची जोड देऊन रेल्वेचा पूर्ण चेहराच बदलून टाकला. आत्मनिर्भर रेल्वे! आत्मनिर्भर भारत! हे समीकरण जळवून आणून जगाचे लक्ष रेल्वेकडे आकर्षित केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक जागतिक दर्जावर सुरु झाली व आधुनिकतेचे तंत्रज्ञान भारतात येऊ लागले. ४५० कोटींचा लोटे येथील प्रकल्प असून त्याचे दोन टप्पे पूर्ण होत आले आहेत. या प्रकल्पाची आर्थिक तरतुद सुरेश प्रभूंनी पहिल्यांदाच करून ठेवली आहे. या कारखान्यात २०२२ ते २०२३ मध्ये उत्पादन करण्यास सुरुवात होईल असे नियोजन झाले आहे. केंद्र सरकारचा प्रत्यक्ष सहभाग असणारा कोकणातील पहिलाच प्रकल्प साकार होत आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-फिनोलेक्स-इंडस्ट्रीज-आ/

याचाच एक भाग म्हणून प्रभूंनी कोकणात म्हणजे खेड लोटे एम.आय. डी.सी. मध्ये आधुनिक रेल्वे कोच( डबे) व रेल्वे व्हिल बनवण्याचा कारखाना मंजुर केला. लोटे लवेल येथील ४५ एकर जमीन अधोरेखित करून घेऊन रेल्वेच्या ताब्यात दिली. वेल्डर, मोलडींग टेक्निशियन, वायरमन, रंगारी, प्लंबर, फोम मेकर, फिटर यांना रोजगाराची संधी उपलबध होणार आहे. तंत्रनिकेतन (ITI)मध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. प्रभू रेल्वे मंत्री असताना रेल्वे कोच आयात केले जात होते. मोदींनी मेक इन इंडिया, स्टार्टप इंडिया नारा दिला. यांचा प्रभुंनी रेल्वेत उपयोग करून घेतला. रेल्वे कोच दुरुस्तीचे कारखाने कोच बनवु लागले. त्याला चालना प्रभुंनी देऊन ज्या ठिकाणी चीन वर्षाला १२०० कोच बनवत होते तेथे भारत वर्षाला १३१८ कोच बनवून जागतिक क्रमवारीत एक नंबरला गेला. रेल्वे कोच निर्यात करू लागला. सुरेश प्रभुंच्या दूरदृष्टीनेच हे शक्य होत आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-पोस्ट-ऑफिस-वेंगुर्ला-नज/

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण, दुपदरीकरण, रेल्वे स्टेशनचे आधुनिकरण, सर्व स्टेशन वर कोकणी मेव्याचे स्टॉल, नवीन स्टेशन , सोलर विद्युतीकरण असे सर्वसामान्य कोकणी माणसाला आवश्यक असणाऱ्या सुविधा देताना आर्थिक हातभार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा लागेल याचा प्रभूंनी प्राधान्याने पाहीले समस्त कोकणवासियांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here