Ratnagiri: ट्रक चालकाची चूक 10 जणांच्या जीवावर

0
27
ट्रक चालकाची चूक 10 जणांच्या जीवावर

खेड– मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव- रेपोळीनजीक ट्रक व इको कार यांच्यातील अपघातास ट्रकचालकच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. ट्रकचालकाच्या चुकीमुळेच १० जण प्राणास मुकल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी ट्रकचालक अमृत शंकर खेतरी (४६, रा. रत्नागिरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातास ट्रकचालकासोबतच कंत्राटदारही जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. या मार्गावर 5 उड्डाणपूल व दुभाजकांची कामे सुरू असल्याने वाहतूक वळवली आहे. त्याची माहिती देणारे सूचनाफलक नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. अपघातास कंत्राटदारही जबाबदार असून त्याच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here