Ratnagiri: डॉक्टरची १५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
91
कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती
कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती

रत्नागिरी– वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवत डॉक्टरकडून ऑनलाईन पद्धतीने सुमारे १५ लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणातील संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. फसवणुकीची ही घटना जून २०१९ ते १० मे २०२२ या कालावधीत घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , महेश विठ्ठल अदाते (वय ४२, रा. कसपटे वस्ती, ता. वाकड, जि. पुणे) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात डॉ. अमोल वासुदेव झोपे (वय ३९, रा. पर्णिका एम्पायर आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार महेश अदाते याने त्यांना ‘डिप्लोमा इन डर्माटोलॉजी अ‍ॅन्ड वेनेरिऑलॉजी’ या कोर्सचे प्रवेश करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्या नंतर आपल्या बँक खात्यावर आरटीजीएस, आयएमपीएस व गुगल पेद्वारे १२ लाख ६० हजार रुपये जमा करुन घेतली. तसेच आपल्या वडिलांच्या खात्यावर २ लाख ५० हजार असे एकूण १५ लाख १० हजार रुपये घेतले. परंतू, पैसे घेऊनही वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश मिळवून न देता डॉ. झोपे यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दि. १० मे २०२२ रोजी तक्रार दिली होती. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-कणकवली-देवगड-वैभववाडी-त/

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले यांनी तपास करुन संशयित महेश अदातेला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here