दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित विद्याभारती विभागात आज दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विभाग प्रमुख श्रीमती परब बाई यांच्या हस्ते कृष्णाची पूजा करण्यात आली. त्यानंतर शिशुवाटिका ते माध्यमिक विभागातील सर्व मुलांनी फेर धरला. गोविंदाच्या गाण्यावर व खालू बाजाच्या ठेक्यावर सर्वांनी ताल धरत नाच केला. प्रथम शिशुवाटिकेची सुखी हंडी फोडण्यात आली. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभाग मिळून सर्वांनी थर लावून हंडी फोडली. https://sindhudurgsamachar.in/kokan-कशेडी-बोगदा-कंत्राटदारा/
यावेळी श्री. गायकवाड यांनी गोविंदा ची गाणी म्हटली. श्री. संजय दुबळे यांनी खालू बाजा वाजवला. त्या तालात मुले आनंदाने नाचली. लहान मुलांनी कृष्ण व राधा अशी वेशभूषा केली होती. प्रसाद म्हणून मुलांना पोहे देण्यात आले.अशा रीतीने सर्व कार्यक्रम विभाग प्रमुख श्रीमती परब बाई यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदात साजरा झाला. ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाला संस्था चालकांनी शुभेच्छा दिल्या